दुबईत सायकलवर डबलसीट बसून आलं इस्रोचे रॉकेट; फोटो बघून आठवणी ताज्या होतील

दुबई : जगभरातून अंतराळात रॉकेट्स पाठवले जात होते. मोठे शास्त्रज्ञ अंतराळात झेप घेत होते. अशात भारत कसा मागे राहील. 1963 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान वापरून आपल्या मोहिमा आखता येतील का याची चाचपणी डॉ. भाभा व त्यांचे सहकारी डॉ. साराभाई बघू लागले. त्याकाळात त्यांनी एका खेड्याची निवड करून तिथे सायकलवरून रॉकेट नेले आणि मग तिथून ते अवकाशात झेपावले. हा सगळा इतिहास पुन्हा एकदा आठवण्याचे कारण म्हणजे, दुबईत सुरू असलेला दुबई राईड हा कार्यक्रम.संयुक्त अरब अमिरातमध्ये दुबई राइड हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात जगभरातील लोक सहभागी असून त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी लोक करतात. मूळ भारतीय असलेल्या आणि सध्या दुबईत असलेल्या एका व्यक्तीने सायकलवरून रॉकेट नेऊन या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्या व्यक्तीचे नाव अजमल पोयक्कारा महमूद. यांनी रॉकेट सायकलवरून घेऊन जाणाऱ्या 1963 मधील शास्त्रज्ञांचा फोटो रिक्रीएट केला आहे.दुबईत सुरू असलेल्या या कार्यक्रमात अजमल यांनी पांढरा शर्ट आणि राखाडी पँट घालून सायकल घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सायकलच्या मागच्या स्टॅंडवर रॉकेटसारख्या शंकूच्या आकाराची वस्तू ठेवली होती.याबद्दल बोलताना अजमल म्हणतात की, 'मी मूळचा केरळचा रहिवासी आहे. मला माझी मातृभूमी आणि तिथल्या लोकांप्रती आदर व्यक्त करायचा होता. भारताचे पहिले रॉकेट केरळपासून जवळ असलेल्या थुंबा येथून नोव्हेंबर 1963 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते.पुढे ते सांगतात की, 'सायकल हा आपल्या देशातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जणावरांचा चारा आणण्यासाठी असो वा रॉकेट घेऊन जाण्यासाठी आजही ग्रामीण भागात सायकल हेच प्रमुख वाहन आहे. त्यामुळे मी भारताला रिप्रेझेंट करताना सायकल वापरली.'मी दुबईमध्ये निर्माता म्हणून काम करत आहे. 2020 पासून मी दुबई राइडमध्ये भाग घेत आहे. मी या फोटोसाठी क्लासिक सायकल खरेदी केली आहे. त्या सायकलवरून मी दुबई राईड 12 किलोमीटरचा प्रवास केला आहे, असेही अजमल म्हणाले.

भारताचे दुसरे रॉकेट बैलगाडीतून

भारताने 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळच्या थुंबा येथील एका उंच चर्चमधून रॉकेट प्रक्षेपित केले गेले. काही दिवसांनी दुसरे रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आखण्यात आली. हे रॉकेट पहिल्या रॉकेटपेक्षा थोडेसे जड होते, म्हणून ते बैलगाडीतून नेण्यात आले होते. बैलगाडी सायकलपासून सुरूवात करून आज भारताने अनेक अंतराळातील अनेक मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने