यात्रेत कुस्तीचा फड; राहुल गांधींसमोर कोल्हापूरकर पैलवान भिडले

कोल्हापूर: भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन चार दिवस झाले आहेत. या यात्रेला महाराष्ट्रातील काँग्रेसहित अनेक घटक पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. तर आज राहुल गांधी यांनी कोल्हापूरकरांच्या कुस्तीचा थरार अनुभवलाय. कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी या कुस्त्याचे आयोजन केले होते.



दरम्यान, आज सकाळी सहा वाजताच हा कुस्तीचा फड रंगला होता. यावेळी कोल्हापूरहून आलेले शंभरपेक्षा जास्त लोकं फेटे घालून स्वागतासाठी तयार होते. त्याचबरोबर कोल्हापूरच्या सतेज पाटलांचे सात हजार कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाल्याची माहिती आहे. यात्रेदरम्यान त्यांनी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले आहे.

महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेतेही या यात्रेत सहभागी झाले आहेत. काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने