विवेक अग्निहोत्रीने मागितली बिनशर्त माफी, न्यायालयाने दिले हजर राहण्याचे निर्देशमुंबई:
 
द कश्मीर फाइल्सचे चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमी त्याच्या वक्तव्यामूळे चर्चेत असतात. मात्र भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांना महागात पडलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन देणाऱ्या तत्कालीन न्यायमूर्ती एस मुरलीधर यांच्या विरोधात पक्षपातीपणाचा आरोप त्यांनी केला होता. आता या वक्तव्यासंदर्भात त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे.विवेक आणि इतरांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उत्तर दाखल केले नाही. त्यामूळे विवेक यांनी माफी मागितली आहे. न्यायालयाने विवेक अग्नीहोत्री, आनंद रंगनाथन आणि स्वराज्य न्यूज पोर्टलवर उच्च न्यायालयाकडून तात्पूर्वी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती तलवंत सिंग यांच्या खंडपीठाने प्रतिज्ञापत्रावर विचार करून या प्रकरणाची सुनावणी १६ मार्चपर्यंत स्थगीत केली. न्यायालयाने सांगितले की,"हे प्रकरण न्यायालयाने स्वत:हून घेतले असल्याने, विवेक अग्निहोत्री यांना पुढील तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने