जयंत पाटलांच्या निलंबनानंतर पवार ऍक्शन मोडमध्ये; अजित पवारांना केला फोन अन्...

मुंबई: हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, काल सभागृहात झालेल्या गोंधळामुळे आजचा दिवस चांगलाच गाजणार आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. सभागृहात अपशब्द वापरल्या प्रकरणी जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार यांनी जयंत पाटलांची पाठराखण केली. दरम्यान शरद पवार यांनी अजित पवारांना फोन करत सभागृहात झालेल्या गोंधळाची दखल घेतली. दोघांमध्ये चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईवर शरद पवारांची भूमिका काय ? असा सवास उपस्थित होत आहे.अजित पवारांनी केली पाठराखण

जयंत पाटील गेल्या ३२ वर्षांपासून सभागृहाचे सदस्य असून, त्याचं वागणं, बोलणं, कारकिर्द सर्वांनी पाहिली आहे. ते काही अध्यक्षांना निर्लज्जासारखं काम सुरु आहे म्हणाले नाही. मी पण ३०-३२ वर्षं काम करत आहे. अनेकदा आपण सरकारला काही लाज आहे की नाही म्हणत असतो. सरकार निर्लज्जासारखं वागत आहे अशी विधानं सभागृहात करण्यात आली आहेत. पण हे फार सोयीचं राजकारण करतात,” अशी टीका यावेळी अजित पवारांनी केली.

काय आहे प्रकरण?

हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. अजित पवार यांनीही बोलू देण्याची मागणी केली, पण नार्वेकर यांनी नकार दिला.त्यावेळी, अध्यक्ष महोदय, तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका, अशा शब्दात जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने