'हिंदकेसरी'चा मानकरी अभिजीत कटके आहे तरी कोण?

हैदराबाद: महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटकेने आता हिंदकेसरी खिताब पटकावला आहे. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळालाय असुन अंतिम फेरीत त्याने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केला.हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं करण्यात आलं. अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बाब आहे.
  • एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरीअभिजीत याने या पूर्वी दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्यानंतर तो हिंद केसरीचा मानकरी ठरला.

  • पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा अभिजीत कटके हा पैलवान आहे.

  • अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे.

  • अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता.

  • 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता.

  • अभिजीत वयाच्या बाविशीतही एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो.

पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजितने सोमवीरला आक्रमणाची संधी मिळू दिली नाही. गुणांची बढत घेऊन सोमवीरवर दबाव वाढवला. दुसऱ्या फेरीत नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सोमवीरला सूचना दली. मात्र तीस सेकंदात तो अभिजितचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजितला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला मात्र अभिजितपुढे त्याची डाळ शिजली नाही. पाच विरुद्ध शून्य गुणांची कमाई करून अभिजितने प्रतिष्ठेची लढत खिशात टाकली.अभिजित पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. यापूर्वी अभिजितने महाराष्ट्र केसरी, भारत केसरी किताब जिंकला आहे. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दीनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान अभिजितने पटकावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने