'तिचे डोळे...', करीना नव्हे तर 'ही' होती सैफची क्रश

मुंबई:  'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पतौडीचा नवाब सैफ अली खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याचे कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सध्या त्याने दिलेल्या एका वक्तव्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली आहे, जे त्याने खूप पूर्वी श्रीदेवीबद्दल दिले होते. यावेळी तो म्हणाला होता की, श्रीदेवी ही प्रत्येक माणसाची क्रश होती.1994 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सैफने श्रीदेवीबद्दल सांगितले होते. ज्यामध्ये तो म्हणाला, "श्रीदेवी ही प्रत्येक माणसाची क्रश आहे. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तिला खूप चांगल्याप्रकारे बनवले गेले आहे, ती पूर्णपणे प्रोफेशनल आहे. ती खूप सडपातळ देखील आहे. मला असे वाटते मुलींनी टूथपिक सारखे पातळ नसावे".त्याच मुलाखतीत सैफला पुढे विचारण्यात आले की, जर एखाद्या निर्मात्याने त्याला 'टॉप हिरोईनसोबत काम' करण्याची ऑफर दिली तर तो कोणाची निवड करेल. ज्यावर सैफ म्हणाला, अमृता सिंगच्या म्हणण्यानुसार तो काजोलसोबत परफेक्ट दिसत असला तरी त्याला श्रीदेवीसोबत काम करायचे होते.तो म्हणाला, "श्रीदेवीची निवड न करणे माझ्यासाठी मूर्खपणाचे ठरेल. पण स्टोरीमध्ये आपल्याला बरोबर दिसले पाहिजे. आतापर्यंत असे म्हटले जाते की मी परंपरामध्ये नीलम आणि इम्तिहानमध्ये रवीना टंडनसोबत बरोबर दिसत होतो. पण डिंगी (अमृता सिंग) बोलते मी काजोलसोबत परफेक्ट दिसतो. त्यामुळे हे सर्व मताचा विषय आहे".सैफला नक्कीच अभिनेत्री श्रीदेवीसोबत काम करायचे होते. पण असे कधीच होऊ शकले नाही, हे दोघेही कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत. दोन्ही कलाकार 1994 मध्ये फिल्मफेअरच्या मुखपृष्ठावर एकत्र दिसले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने