प्रकरणात मोठी अपडेट! नूपुर शर्मांना मिळाली महत्त्वपूर्ण परवानगी

नवी दिल्ली : भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांना मोठी परवानगी मिळाली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे नुपूर शर्मा चर्चेत आल्या होत्या. त्यांना आता दिल्ली पोलिसांकडून पिस्तुलाचा परवाना मिळाला आहे.प्रेषित मोहम्मद पैगंरबर यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे नुपूर शर्मा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या आहेत.नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आल्यानंतर नुपूर शर्मा यांना भारतीय जनता पक्षाने निलंबित केले होते. अशीच वादग्रस्त विधाने केल्याबद्दल भाजपने दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी केली होती.

भाजपच्या या दोन नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानांवरही काही मुस्लिम देशांनी अधिकृत नाराजी व्यक्त केली होती. कुवेत, कतार, इराणसह अनेक मुस्लिम देशांनी नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.यानंतर भाजपने या दोन्ही नेत्यांवर कारवाई करत एक निवेदन जारी केलं होतं, ज्यात म्हटलं होतं की, ते सर्व धर्मियांचा आदर करतात आणि कोणत्याही धर्माच्या अपमानाचा निषेध करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने