उर्वशीपेक्षा तिच्या आईलाच ऋषभची काळजी, 'माझ्या...'

मुंबई:  भारतीय क्रिकेट संघातला स्टार फलंदाज ऋषभ पंत याचा अपघात झाला आणि चाहत्यांची काळजी वाढली. सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी वेगवेगळया कमेंट्स दिल्या आहेत.काही दिवसांपूर्वी ऋषभच्या मैत्रीणीनं उर्वशीनं केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. उर्वशीच्या आईनं देखील ऋषभ लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे धावा केला होता. आता त्यांनी दुसरी पोस्ट शेयर केली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. त्यावरुन नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.उर्वशची आई मीरा यांनी ऋषभसाठी शेयर केलेली पोस्ट चर्चेत असून त्यांनी ऋषभ तू तुझ्या प्रकृतीची काळजी घे असे म्हटले आहे. तू लवकरच आता या संकटातून बाहेर येशील. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. अशा आशयाची ती पोस्ट नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय आहे. मीरा यांनी एका मंदिराच्या बाहेर उभे राहून फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिली आहे. त्यात त्या म्हणतात, बाळा सर्व काही ठीक होईल. चिंता करु नको.उर्वशीच्या आईनं शेयर केलेली ती पोस्ट नेटकऱ्यांना मात्र गोंधळात टाकताना दिसत आहे. दुसरीकडे उर्वशीही ट्रोल होत आहे. ऋषभवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.

ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील वाद हा सगळ्यांनाच माहित आहे. उर्वशी नेहमी अशी काहीतरी पोस्ट करते ज्यांचा सबंध कळत नकळत ऋषभ याच्याशी जोडला जातो. ऋषभच्या अपघातानंतरही तिने पोस्ट केली आणि आता तर तिने रिषभवर उपचार सुरू असलेल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाच्या बाहेरचा फोटो शेअर केला होता. .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने