काळीज पिळवटून टाकणारी ती घटना, तब्बल ५९ कारसेवकांची रेल्वेच्या डब्यात जिवंत आहुती

मुंबई: इतिहासातल्या काही घटना अभिमानास्पद आहेत तर काही घटना या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. म्हणूनच इतिहासातील काही घटना या सुवर्ण अक्षराने कोरल्या जाव्यात त्याप्रमाणे भारतीयांच्या काळजावर कायमच्या कोरल्या गेल्यात.त्या घटना भारतीयांना कधीच विसरता आल्या नाहीत. आजही या घटना आठवून अंगाला शहारा येतो. 27 फेब्रुवारीचा तो दिवस काळीज पिळवटून टाकणारा होता.अहमदाबादला जाणारी साबरमती एक्स्प्रेस नुकतीच गोध्रा स्टेशनवरून निघाली होती की कोणीतरी साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि त्यानंतर दगडफेक करून ट्रेनच्या एका डब्याला आग लागली होती.२७ फेब्रुवारीचा दिवस इतिहासात एक दुःखद घटना म्हणून नोंदला जातो. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा स्टेशनवरून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला उन्मादी जमावाने आग लावली आणि या भीषण आगीत ५९ लोकांचा मृत्यू झाला.मृत्यूमुखी पडलेले ट्रेनमधील लोक हिंदू यात्रेकरू होते आणि ते अयोध्येहून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय हिंसाचार उसळून आला आणि मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना लोकांना शांततेचे आवाहन करावे लागले. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात २७ फेब्रुवारीचं दु:ख कायमचं कोरलं गेलं.साबरमती ट्रेनच्या S-6 या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवलं होतं, तर ६३ जणांना निर्दोष मुक्त केलं. आरोपींपैकी ११ जणांना फाशी, तर २२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आरोपींना दिलेली शिक्षा कमी आहे, निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारने केली होती. तर आपल्याला अजून न्याय मिळाला नसल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने नानावटी आयोगाची स्थापना केली. साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 बोगीत लागलेली आग ही एक घटना नव्हती, तर तो एक कट होता, असं या आयोगाने म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने