ऋषी सुनक यांच्या पत्नीची गोव्यात धमाल! पर्यटनासाठी मुलींसोबत थेट गाठला भारत

पणजी : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती त्यांच्या दोन मुली आणि आई सुधा मूर्ती यांच्यासोबत दक्षिण गोव्यातील बेनौलीम बीचवर सुट्टी घालवताना दिसल्या.फ्रान्सिस फर्नांडिस नावाच्या एका मच्छिमाराने सांगितले की, ब्रिटनच्या फर्स्ट लेडी (अक्षता मूर्ती) यांनी आपल्या 'वॉटर स्पोर्ट्स'बद्दल माहिती विचारली, तेव्हा मी लगेच त्यांना ओळखलं. फर्नांडिस यांनी स्थानिक लोक पेले नावाने संबोधतात.स्थानिक लोकांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये पेले अक्षता यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. नंतर मच्छिमाराने अक्षता आणि सुधा मूर्तीसोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अक्षताचे वडील नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आहेत.पेले म्हणाले, “अक्षता यांनी मला विचारले, गोव्यात वाटरस्पोर्ट्स सुरक्षित आहे का? 'मी म्हणालो 'मॅडम, 100 टक्के सुरक्षित आहे' आणि जर तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा असेल तर मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल.अक्षता यांच्यासोबतच्या संभाषणाचा अधिक तपशील शेअर करताना, पेले म्हणाले, “बोटीत बसण्यापूर्वी मी त्यांना म्हटलं की, यूकेमध्ये बरेच गोव्याचे नागरिक राहतात आणि मला आशा आहे की तेही सुरक्षित राहतील. यावर उत्तर देताना अक्षता म्हणाल्या की, नक्की ते सुरक्षित राहतील. बेनौलीम बीचवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला देखील पेले यांनी सर्व्हिस दिली होती.ऋषी सुनक आणि अक्षता यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुली (अनुष्का आणि कृष्णा) आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने