पहिल्याच सामन्यात गुरू शिष्य भिडणार; आयपीएल 16 व्या हंगामाची तारीख झाली जाहीर

मुंबई: आयपीएल 2023 अर्थात 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून आयपीएलचा हा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार असून हंगामातील लीगचा शेवटचा सामना 21 मे ला होणार आहे. पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलचे 10 संघ लीग स्टेजमध्ये 70 सामने खेळणार आहे. आयपीएलचा हा कुंभमेळा जवळपास दीड महिना चालणार आहे.आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरूवात धमाकेदार होणार आहे. 31 मार्च 2023 ला पहिलाच सामना हा गतविजेचा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. या सामन्यानेच आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे.बीसीसीआयने अजून आयपीएलच्या प्ले ऑफची तारीख जाहीर केलेली नाही. लीग स्टेजमध्ये 54 मॅच डे मध्ये 70 सामने होणार आहेत. यात 18 डबलहेडर होणार असून प्रत्येक संघ 7 सामने घरच्या तर 7 सामने दुसऱ्या मैदानावर खेळणार आहेत. आयपीएलच्या 16 व्या हंगामात 10 संघांची विभागणी ही दोन ग्रुपमध्ये केली आहे.
IPL 2023 ग्रुप A

  • मुंबई इंडियन्स

  • राजस्थान रॉयल्स

  • कोलकाता नाईट रायडर्स

  • दिल्ली कॅपिटल्स

  • लखनौ सुपर जायंट

IPL 2023 ग्रुप B

  • चेन्नई सुपर किंग्ज

  • पंजाब किंग्ज

  • सनराईजर्स हैदराबाद

  • रॉयल चॅलेंजर बेंगलोर

  • गुजरात टायटन्स

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने