विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल CM शिंदेंनी निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र; ऐका त्यांच्याच तोंडून...

पुणे : MPSCपरीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नच्या विरोधात विद्यार्थी सध्या आक्रमक झाले आहेत. नवा पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी हे विद्यार्थी करत आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यावरुन आता ते चर्चेत आले आहेत.याविषयी माध्यमांशी बोलताना CM शिंदे म्हणाले, "ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिलेलं आहे, कळवलं आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. कालही आम्ही पत्र दिलेलं आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका त्यासोबत सरकार सहमत आहे आणि तशीच परीक्षा व्हावी."एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा. तसंच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिन्यांचा वेळ मिळावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. तसंच नव्या परीक्षा पॅटर्ननुसार पुस्तकं उपलब्ध नाहीत, ती उपलब्ध व्हावीत, असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने