बंड होणार हे उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी आधीच सांगितलं होत; अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पवार आज पुण्यात बोलत होते. ते म्हणाले की, "शिवसेनेचे आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती.पवार साहेबांनी फोन करुन, मीटिंग केली होती. पण उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे." पण स्वत: पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली.अजित पवार म्हणाले, या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या, आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं, तिकडे हे व्हायला नको होतं. मी देखील स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं पण ते बोलले की मी बोलेन एकनाथ शिंदे यांच्याशी तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे. असं उत्तर उद्धवजींनी मले दिलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने