श्रीकांत शिंदेंनी मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप; राऊतांच्या आरोपावर CM शिंदे म्हणतात...

मुंबई: खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल, असं आश्वासन दिलं आहे. शिंदे म्हणाले, "राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल. त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची समिती निर्णय घेईल. राऊतांनी जे आरोप केलेत त्याचीही चौकशी होईल. ही स्टंट बाजी आहे का हे ही तपासली जाईल. कोण विरोधीपक्षात आहे. याचा विचार न करता गरज असल्यास सुरक्षाही पुरवली जाईल."खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी ठाण्यातल्या कुख्यात गुंडाला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे. या प्रकारानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने