३० वर्ष रस्त्यावर राहिला,प्लास्टीक कचरा उचलला; भिकारी कसा बनला करोडपती?

स्वीडन: आयुष्याची तीस वर्ष ज्याने केवळ कचरा उचलला. मिळेल ते खात रस्त्यावर झोपला तो माणूस कधीतरी करोडपती होईल, असा विचार तूम्ही करू शकता का?. तर नाही. इथे रोज कष्टाची कामं करणारा मजूरही तो करोडपती होईल असे स्वप्नातही पाहू शकत नाही. पण, एका व्यक्तीने ही गोष्ट साध्य करून दाखवली आहे.रस्त्यावरून रिकामे डबे, प्लास्टिकच्या बाटल्या इत्यादी वस्तू उचलताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. हे लोक कचरा उचलून एवढीच कमाई करतात, त्यामुळे त्यांना एक वेळची भाकरीही मिळत नाही. पण, कर्ट डेगरमन याने ही गोष्ट सत्यात उतरवली आहे.कर्ट हा उत्तर स्वीडनमधील स्केलेफ्टी या छोट्याशा शहराच्या रस्त्यावर 30 वर्षे रिकामे टिनचे डबे आणि बाटल्या गोळा करण्याचे काम करायचा. आयुष्यात अनेक चढ-उतार आले असूनही डेगरमन यांनी आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूकीमध्ये प्रभुत्व मिळवले आहे.

प्लास्टीक डबे जमा करून डीगरमन जे काही कमावत होते त्यावर ते समाधानी नव्हता. आयुष्यात भरपूर पैसे कमवायचे असे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने पैसे कसे कमवायचे याऐवजी त्याचे आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती गोळा केली.हि माहीती त्याला पुस्तकांशिवाय इतर कोणीही चांगल्याप्रकारे देऊ शकत नव्हते. त्यामूळेच रोज होणाऱ्या कमाईतील मोठा हिस्सा त्याने सिटी लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचण्यासाठी केला. पूस्तकांनी त्याला रोजच्या पैशाचे आर्थिक नियोजन कसे करावे, पैसे कशात गुंतवावेत, पैसे म्युचुअल फंडमध्ये गुंतवण्याचे फायदे तोटे, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती दिली.   यामुळेच ते रोज स्थानिक लायब्ररीत जायचे आणि पुस्तके वाचत बसायचे. या काळात त्यांनी अनेक व्यावसायिक पेपर्स आणि शेअर मार्केटचा अभ्यास करून लायब्ररीत दररोज तास घालवायला सुरुवात केली. हळूहळू ते गुंतवणुकीत तरबेज झाले. त्यांना शेअर बाजाराचीही चांगली माहिती मिळाली.कर्ट डेगरमन यांनी टिनचे डबे उचलण्याच्या कामातून मिळालेली कमाई म्युच्युअल फंडात गुंतवण्यास सुरुवात केली. हळूहळू जेव्हा त्याच्याकडे पैसे येऊ लागले तेव्हा त्याने 124 सोन्याची बिस्कीटे खरेदी केली.त्याने आपल्या कमाईचा काही भाग बचत खात्यात सतत जमा केला. कोटय़वधी रुपये कमावणाऱ्या कर्टकडे कार नव्हती, असे म्हटले जाते. कुठेही जाण्यासाठी तो त्याची एकमेव सायकल वापरायचा. अशा प्रकारे तो आणखी पैसे वाचवू शकतो. कर्टने त्याचे घरही विकत घेतले नाही. कारण त्याला भाडे द्यावे लागले असते.30 वर्षे रस्त्यावरून टिनचे डबे आणि रिकाम्या बाटल्या गोळा करणाऱ्या कर्टने योग्य आणि चांगल्या गुंतवणुकीने $1.4 दशलक्ष कमावले होते. कर्टला केवळ एक चुलत भाऊ होता तोच त्याला अधून मधून भेटायला यायचा. 2008 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने कर्ट डेगरमन यांनी या जगाचा निरोप घेतला.असे म्हटले जाते की त्यांच्या नंतर त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांच्या चुलत भावाला देण्यात आली होती. मात्र कर्टची मालमत्ता आता वादात सापडली आहे. स्वीडनच्या उत्तराधिकार कायद्यानुसार, त्याच्या एका काकांनी त्याच्या मालमत्तेवर दावा केला आहे. या मालमत्तेच्या वादात त्याच्या काका आणि चुलत भावाने एक करार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्ट करोडपती कसा बनला?

कर्ट करोडपती कसा बनला याचे दोन सोपे मार्ग म्हणजे, कर्ट याने घर, गाडी, बंगला यात न अडकता खर्च कमी केला. तसेच, पैशांची किंमत ओळखून त्याने पैसे वाचवले आणि ते योग्य ठिकाणी गुंतवले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने