धंगेकरांनी शपथविधीवेळी आपल्या नावापुढे लावलं आईचे नाव

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून नवनिर्वाचित आमदार धंगेकरांनी आज शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे.शपथ घेताना रविंद्र धंगेकर म्हणाले की, "मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. 

मी रविंद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने..." असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.दरम्यान, रविंद्र धंगेकर कसब्यातून निवडून आल्यानंतर "हू इज धंगेकर" हा चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराता मारलेला डायलॉग खूप फेमल झाला होता. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून धंगेकर विजयी झाले होते. तर कसब्याची निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची होती. ही निवडणूक हरल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने