मनिकाच्या पराभवासह भारतीयांचे आव्हान संपुष्टात

सिंगापूर : भारतीय टेबल टेनिसपटूंनी निराशाजनक कामगिरी केली.मनिका बत्रा हिला महिला दुहेरी व मिश्र दुहेरी या दोन्ही विभागांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीयांचे सिंगापूर स्मॅश टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.हिना हयाता - तोमोकाझू हरीमोतो या जपानच्या खेळाडूंनी मनिका बत्रा- जी. साथियन या भारतीय जोडीवर ११-९, ११-९, ८-११, ५-११, ११-७ असा विजय साकारला. जागतिक स्पर्धेमध्ये हिना व हरीमोतो या जोडीने रौप्यपदक पटकावले होते, पण चौथ्या मानांकित या जोडीला भारतीय जोडीने कडवी झुंज दिली हे विशेष.ही लढत ५२ मिनिटे रंगली. दरम्यान, या लढतीआधी मनिका - साथियन या जोडीने झियान झेंग - चेव यू या सिंगापूरच्या जोडीवर ११-७, १२-१०, ९-११, ११-३ असा विजय मिळवत पुढे पाऊल टाकले होते. पहिल्या फेरीत मनिका - साथियन जोडीला पुढे चाल मिळाली होती.महिला दुहेरीत अपयश

मनिका बत्रा - अर्चना कामत या भारतीय जोडीला महिला दुहेरीत अपयशाचा सामना करावा लागला. मेंग चेन - ईडी वँग या चीनच्या जोडीने मनिका - अर्चना जोडीवर ११-२, ११-६, १३-१५, १०-१२, ११-६ असा विजय नोंदवला. ४२ मिनिटांमध्ये भारतीय जोडीचा पराभव झाला.

एकेरीतही प्लॉप शो

भारतीय खेळाडूंना एकेरी विभागातही यश मिळाले नाही. मनिका बत्रा, जी. साथियन व शरथ कमल या दिग्गज खेळाडूंना एकेरीत सपाटून मार खावा लागला. पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांचे आव्हान सुरुवातीलाच संपले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने