CSKचा तात्या आज रचणार मोठा इतिहास; या बाबत धोनीच्या आसपासही नाही कोण

मुंबई: माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. महेंद्रसिंग धोनी आज बुधवारी चेपॉक येथे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम करणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीसाठी खूप खास असेल. खरंतर महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून 200 वा आयपीएल सामना खेळणार आहे.महेंद्रसिंग धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच सीएसकेसाठी 200 आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधार बनणार आहे. म्हणजे आतापर्यंत त्याने 199 आयपीएल सामन्यांमध्ये सीएसकेची कमान सांभाळली आहे. आता तो ऐतिहासिक कामगिरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे.



चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून एमएस धोनीची कारकीर्द नेत्रदीपक राहिली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलच्या गेल्या 15 हंगामात 11 वेळा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे, ज्यामध्ये त्यांनी 4 वेळा विजेतेपदावरही कब्जा केला आहे.धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले. या यशामुळे धोनी जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगमधील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 140 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 64 सामने जिंकता आले आहेत. तर त्यांना 69 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.आयपीएलचा सर्वात यशस्वी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 143 सामने खेळले आहेत. यापैकी 79 सामने जिंकले आहेत. तर 60 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने