राजकीय परिस्थितींचा आढावा घेतल्यानंतर अमित शाहांची भाजप नेत्यांसोबत शनिवारी बैठक

दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबईतील दौऱ्यामध्ये वाढ झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. या तयारीचा आढावा आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार आहेत. यासाठी अमित शाह शनिवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.



दरम्यान अमित शाह या बैठकीत 'मिशन 45' चा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना राज्यातील वातावरण कसं आहे? यासोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुका लागल्या तर मुंबईत भाजपची काय स्थिती आहे, याचा आढावा देखील अमित शाह या बैठकीत घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेचे निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महानगर पालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी आता केंद्रीय नेतृत्वही कामाला लागले आहेत. कालच आशिष शेलार यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुंबई महानगर पालिकेबद्दल आढावा घेतला.

पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडीसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शाह यांना दिली आहे.तर या दोन्ही भाजप नेत्यांनी दिल्लीत अमित शाह आणि जे पी नड्डा यांची घेतली भेट यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितिमध्ये अनेक घडामोडी घडत असताना दिसत आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडींचा आढावा शाह यांनी दोन्ही नेत्यांकडून जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने