मुंबई: प्रोटीनचं मुबलक प्रमाण असलेलं सोयाबीन हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. साधारण अनेकजण आहारात सोयबीन तेल , सोयबीन वडी किंवा सोयाचाप अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतात.मात्र सोयाबीनपासून तयार करण्यात आलेलं सोया मिल्क म्हणजेच दूधहे देखील आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.म्हैस आणि गायीच्या दूधाप्रमाणेच सोया मिल्कमध्ये देखील अनेक पोषक गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमच्या आहारात सोया मिल्कचा समावेश करणं तुम्हाला लाभदायत ठरू शकतं.नेकांना म्हैस आणि गायीचं दूध पिणं आवडतं नाही तर काहींना हे दूध पचण्यास त्रास होते. तसचं अनेकांना लॅक्टोड इन्टॉलरेंसची समस्या असते अशांसाठी सोया मिल्क हा एक उत्तम पर्याय आहे.
Soya Milk Benefits:
अनेक विटामिन्स, खनिजं, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेलं सोया मिल्क हे एक शुद्ध शाकाहारी दूध मानलं जातं.यात विटामिन बी12, प्रोटीन, सोडियम, फाइबर, पोटॅशियम, फॅटी एसिड, फॉस्फोरस, आयरन आणि मिनरल्स उपलब्ध असतात. हाडांसाठी हे दूध उपयुक्त ठरतं.त्याचसोबत या दूधाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढत नाही.वजन Weight कमी करण्यासाठी सोया मिल्कचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो. सोयाबीनचे आरोग्यासाठी कसे फायदे आहेत हे आपण आज पाहुयात.हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर- अलिकडे कमी वयातच हाडं कमकुवत होण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठीच सोया मिल्कचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. सोया दूधात तुम्ही मध मिसळून त्याचं नियमित सेवन केल्यास हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.यातील विटामिन डी, आयरन आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांमुळे हाड बळकट होतात.रोज एक कप सोया मिल्कचं सेवन केल्यास ऑस्टियोपोरोसिस आणि आर्थराइटिस सारख्या समस्यांपासूनबही बचाव करणं शक्य आहे.
हृदयासाठी फायदेशीर- हृदया निरोगी राहण्यासाठी सोया मिल्कचं सेवन फायदेशीर ठरतं. आयुर्वेदातही सोया मिल्कला अत्यंत पोषक दूध मानण्यात आलं आहे.सोया दूधात चांगले फॅटी ऍसिड आणि चांगले फॅट असतात जे निरोगी हृदयासाठी गरजेचे असतात. त्यामुळेच हृदयाचं कार्य योग्य प्रकारे चालतं आणि आजारांचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी सोया मिल्क- जर तुम्ही वाढत्या वजनाच्या समस्येमुळे चिंताग्रस्त असाल तर तुम्ही दररोज सोया मिल्कचं सेवन करू शकता.सोया मिल्कमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असंत तर फायबर भरपूर असतं यामुळे भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वरचेवर खाण्याची सवय नियंत्रणात येते.वजन कमी करण्यासाठी सोया मिल्कमध्ये एक चमचा मध मिसळून प्यायल्यास त्याचा तुम्हाला फायदा होवू शकतो. यामुळे शरीरातील चरबी जलद गतीने कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोय मिल्कचं सेवन करावं. यातील मुबलक प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट इम्यूनिट बूस्ट करण्यास मदत करतात.तसचं सोया मिल्कमधील विटामिनब बी १२ मुळे शरीरातील थकवा आणि मरगळ दूर होते. नाश्तावेळी सोया मिल्कचं सेवन केल्यास दिवसभर शरीरामध्ये उर्जा राहते.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर- केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं. सोया मिल्कच्या सेवनाने केसांसाठी आवश्यक प्रोटीन मिळत असल्याने केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते.यामुळे केसांची जलद वाढ होते. तसचं या दूधाच्या सोवनाने हायपरपिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. तसचं या दूधातील काही तत्व हे अँटी- एजिंगचं काम करतात. त्यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.
अॅनिमियाचा धोका टळतो- सोया मिल्कमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. यामुळे एनिमियाचा धोका कमी होतो. तसचं शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कॅन्सरचा धोका कमी- सोया दूधात अनेक महत्वाचे गुणधर्म आहेत. यात सोया प्रोटीन आणि आयसोफ्लेवोंस ही गुणधर्म आढळता.. यातील आयसोफ्लेवोंस हे अँटी- एस्ट्रोजेनिक गुणांनी समृद्ध असतं. त्यामुळे स्तनांचा कॅन्सर चा धोका टाळता येऊ शकतो. या मुळे कॅन्सरच्या कोशिका वाढत नाहीत. तसचं ट्युमरची वाढ होण्यास रोखलं जातं.सोया मिल्कचा तुम्ही आहारात सकाळी नाश्त्याच्या वेळी समावेश करू शकता. तसंच विविध स्मूदी बनवण्यासाठी नेहमीच्या म्हैस किंवा गायीच्या दूधाऐवजी सोया मिल्कचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं.