"बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत"; निवृत्त न्यायाधीशांनी सुनावलं!

दिल्ली:  सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांनी मंगळवारी सांगितलं की, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करणारे कॉलेजियम अत्यंत अपारदर्शक पद्धतीने काम करते आणि न्यायाधीशांवरील आरोप समोर आल्यावर कोणतीही कारवाई करत नाही.ते असंही म्हणाले की बरेच न्यायाधीश आळशी आहेत आणि वेळेवर निकाल लिहित नाहीत तर इतर बरेच अकार्यक्षम आहेत. "कॉलेजियमसमोर काही आरोप येऊ शकतात परंतु सहसा काहीही केले जात नाही. आरोप गंभीर असल्यास कारवाई केली पाहिजे. सामान्य उपाय म्हणजे फक्त न्यायाधीशांची बदली करणे... काही न्यायाधीश केवळ आळशी असतात आणि निकाल लिहिण्यासाठी वर्षानुवर्षे लावतात. काही न्यायाधीश अकार्यक्षम आहेत,"असंही चेलमेश्वर पुढे म्हणाले.केरळ उच्च न्यायालयात भारतीय अभिभाषक परिषद केरळच्या वतीने आयोजित "संविधानासाठी कॉलेजियम बाहेरुन आलेलं आहे का?" या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात न्यायमूर्ती चेलमेश्वर उद्घाटनपर भाषण देत होते. निवृत्तीनंतर या विषयावर बोलल्याबद्दल त्यांच्यावर टीका आणि ऑनलाइन ट्रोलिंग होऊ शकते, असंही ते म्हणाले.कोणत्याही लोकशाहीच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. "असं नसेल काय होईल याची फक्त कल्पना करा. एक पोलिस काय करू शकतो याची कल्पना करा. ते वाईट आहेत असं नाही परंतु त्यांच्याकडे शक्ती आहे आणि ते स्वतःसाठी कायदा बनू शकतात,"असंही चेलमेश्वर पु़ढे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने