ट्रेन ड्रायव्हरला कसा काय कळतो पुढचा रूट, नेमकी कुठली टेक्नॉलॉजी वापरतात?

मुंबई: तुम्ही कधीतरी रेल्वेचा प्रवास नक्कीच केला असेल. रेल्वेचा प्रवास करताना मात्र हा विचार कधी तुमच्या मनात आलाय का की रेल्वेच्या ड्रायव्हरला पुढचा रस्ता कसा कळतो? बसप्रमाणे त्याला सरकट पुढचे दिसत नाही. मग यामध्ये नेमकी कुठली टेक्नॉलॉजी वापरतात? कधीतरी अनेकांना पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.रेल्वे रूळाला नेव्हिगेट करण्यासाठी ट्रेन ड्रायव्हर सिग्नल, ट्रॅक, स्विच आणि शेड्युलच्या काँम्बिनेशनचा वापर करतात. रूळावर धावताना ट्रेनला ट्रेनच्या पुढल्या रस्त्याबाबत संकेत दिले जातात.गरज पडल्यास पायलटला ट्रॅक स्विच करण्याची परवानगी देण्यात येते. याव्यतिरिक्त ट्रेन ड्रायव्हर एका शेड्युलचं पालन करतात ज्यात ट्रेन कुठल्या रूळाने न्यायची आहे आणि कुठल्या स्टॉपवर थांबायचं आहे याबाबत सगळं सांगितलेलं असतं.रेल्वेबाबत सगळ्या सूचना रेल्वे कंट्रोल रूममधून सुनिश्चित केल्या जातात.ट्रेन ड्रायव्हर ट्रेन कंट्रोल कशी करतात?

लोको पायलटला ट्रेन चालवताना कसं आणि कुठे जायचं आहे, याबाबतची माहिती होम सिग्नलद्वारे दिली जाते. ट्रेनचा वेग नियंत्रित करणे आणि नियोजित थांबे तयार करणे ही त्याची जबाबदारी आहे.

आधी रेल्वे ट्रॅक कशी बदलली जायची?

यापूर्वी, ट्रॅकच्या प्रत्येक विभागात तैनात असलेल्या केबिन बॉयद्वारे रेल्वे ट्रॅक बदलण्याचे काम हाताने केले जात होते. पण आता आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समुळे ही प्रक्रिया स्वयंचलित आणि कार्यक्षम झाली आहे.अनेकांना रेल्वेच्या या नियंत्रणाबाबत आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या टेक्नॉलॉजीबाबत माहिती नसतं. तेव्हा ही माहिती प्रत्येकासाठीच फार फायद्याची ठरते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने