भेंडी कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास ब्लड शुगर व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते?

 पोट साफ होत नसेल किंवा डायबिटीज, अतिवजन ते अगदी वाढलेले कोलेस्ट्रॉल असे त्रास असतील तर भेंडीचे सेवन फायदेशीर ठरू शकते, असं आजवर तुमच्याही आजी- आईने सांगितले असेल. चिरलेली भेंडी रात्रभर भिजवून सकाळी हे पाणी पिणे हा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नामी उपाय असल्याचे सांगितले जाते पण यात नेमकं काही तथ्य आहे का? भेंडीच्या सेवनाची सर्वोत्तम पद्धत कोणती हे सुद्धा आपण आज तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

भेंडी ही फळभाजी आहे दोन कारणांमुळे मधुमेहींसाठी चांगली आहे. भेंडी ही आहारातील अघुलनशील फायबरचा समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे तुम्हाला भेंडीच्या सेवनानंतर पोट भरल्यासारखे वाटते व साखर खाण्याची लालसा कमी होते. भूक नियंत्रणात आल्याने शरीरातील कॅलरीचा भार कमी होतो. शिवाय आतड्यांद्वारे साखरेचे शोषण कमी होऊ शकते.


जर्नल ऑफ फार्मसी अँड बायो अलाईड सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या २०११ च्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की मधुमेही उंदरांमध्ये वाळलेल्या भेंडीच्या साली आणि बिया खाल्ल्याने त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत घट झाली होती. तर इतरांनी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत हळूहळू घट दर्शविली.

शालिनी गार्विन ब्लिस, कार्यकारी आहारतज्ञ, मणिपाल हॉस्पिटल, गुरुग्राम आणि दीप्ती खातुजा, क्लिनिकल न्यूट्रिशनच्या प्रमुख, FMRI, गुरुग्राम, भेंडीचे सेवन करण्याचे फायदे आणि ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग शेअर केला आहे.

भेंडी रक्तातील साखरेची पातळी कशी स्थिर करते?

१०० ग्रॅम भेंडीमध्ये ४ ग्रॅम विरघळणारे आणि अघुलनशील तंतू असतात. या तंतूंच्या पचनासाठी अधिक वेळ लागत असल्याने रक्तामध्ये साखरेचे शोषण होण्यासाठी, जास्त वेळ लागतो. त्यामुळे, रक्तातील साखर अचानक वाढू किंवा कमी होत नाही आणि स्थिर राहते. याशिवाय, भेंडी फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम, लिनोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, प्रोटीन आणि फोलेट यांसारख्या इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. फक्त एक कप शिजवलेल्या भेंडीमध्ये सुमारे ३७ मायक्रोग्राम (mcg) फोलेट असते.

मधुमेहींसाठी भेंडी उत्तम का ठरते?

फायबर व्यतिरिक्त, भेंडी अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेटचा समृद्ध स्रोत आहे, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास आणि मधुमेह न्यूरोपॅथीची प्रगती कमी करण्यास मदत होते. भेंडीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) व भरपूर प्रमाणात द्रव असतात ज्यामुळे रक्तातील साखर व कॅलरीज दोन्ही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

भेंडी खाण्याचे फायदे काय आहेत?

उच्च फायबर युक्त भेंडी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी चांगली आहे. त्यात पेक्टिन हे एन्झाइम असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित होते.

भेंडी पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळते आणि कर्करोगाचा धोका कमी करते. तसेच भेंडी अॅनिमियाला देखील प्रतिबंधित करते.

भेंडीचे म्युसिलेज कोलेस्टेरॉलला बांधते आणि यकृतातील विषारी पदार्थ वाहून नेणारे पित्त आम्ल बाहेर काढते.

४७.४ टक्के लिनोलिक ऍसिडसह, भेंडी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचा एक चांगला स्रोत बनते. या एकूण गुणांमुळे भेंडी एक पॉवरहाऊस फूड बनवते.

भेंडीचे सेवन कसे करावे?

मर्यादित तेलात भेंडीची भाजी बनवून पोळीबरोबर खाऊ शकतात. भेंडीचे तुकडे भाजून तुम्ही डाळ, सूप किंवा रस्सेदार भाज्यांमध्ये टाकू शकता. भेंडीच्या शेंगांमध्ये असलेले जाड पातळ पॉलिसेकेराइड सूप आणि सूप किंवा रस्सा घट्ट करण्यासाठी वापरता येऊ शकते. भेंडीच्या बियांपासून बनणारे तेल लिनोलिक आणि ओलेइक ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. हे तेल निरोगी, चवदार आणि सुगंधी असते. दुसरीकडे भेंडीची पाने सॅलड, भाज्या आणि लापशी तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने