दातांवरचा पिवळा घाणेरडा थर होईल झटक्यात साफ, करा हे 4 उपाय

दात केवळ आपल्याला अन्न चावण्यास मदत करतात असे नाही, तर ते आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढवतात. दातांच्या आकारात किंवा रंगात कोणताही बदल केल्यास तुमचे एकंदर रूप खराब होऊ शकते. पांढरे शुभ्र आणि हि-या-मोत्यांसारखे दात कोणाला आवडत नाहीत? काही वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दातांवर घाणेरडा पिवळा-काळा थर साचतो, त्याला टार्टर किंवा प्लेक म्हणतात. टार्टर हा खाण्यापिण्याच्या पदार्थांपासून बनणारा एक पिवळा थर असतो, जो हळूहळू दातांना चिकटून बसतो. हा थर हिरड्यांच्या मुळापर्यंत पोहोचून त्यांना पोकळ बनवू शकतो. यामुळे तुमचे दात पिवळे पडतात.

याशिवाय टार्टर आणि प्लाकमुळे श्वास व तोंडातून दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात किडणे आणि कमजोर होणे, पायरिया आणि वेदना यांसारख्या समस्या उद्भवतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की पिवळे दात पुन्हा पांढरे कसे करावेत? अनेकजण रोज दात घासतात आणि महागडी टूथपेस्ट वापरतात पण तरीही त्यांचे दात पिवळेच राहतात असे अनेकवेळा दिसून आले आहे. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर दिवसातून दोनदा ब्रश करण्याव्यतिरिक्त तुम्ही खाली आम्ही सांगत असलेले घरगुती उपाय देखील करून पहा.
ऑईल पुलिंग करा

ऑईल पुलिंग ही भारतातील दात पांढरी करण्याची एक पारंपारिक पद्धत आहे. यामुळे तोंडातील सर्वच समस्यांचा त्रास संपूर्ण दूर होतो. ऑईल पुलिंगसाठी तोंडात तेल घेऊन ते चारी बाजूला फिरवावे लागते. तुम्ही ज्या पद्धतीने आपण चूळ भरतो तसेही करू शकता. यासाठी सूर्यफूल तेल, तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल वापरा. ऑईल पुलिंगसाठी, एक चमचा तेल घ्या आणि 15 ते 20 मिनिटे तोंडात घुसळा.

केळी, संत्री किंवा लिंबूच्या साली चोळा

केळी, संत्री किंवा लिंबाची साल घ्या आणि हळूवारपणे दातांवर घासा. सुमारे 2 मिनिटे या सालीने दात चोळत राहा, नंतर आपले तोंड चांगले धुवा आणि दात घासून घ्या. या फळांच्या सालींमध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे दात पांढरे करण्यास मदत करते.

फळे आणि भाज्या खूप खा

फळे आणि भाज्या कुरकुरीत असतात आणि त्यांच्या सेवनाने दातांवरील हट्टी पिवळा थर काढून टाकण्यास मदत होते. अननस आणि स्ट्रॉबेरी ही दोन अशी फळे आहेत जी तुमचे दात पांढरे करू शकतात. रिसर्च गेट मधील अभ्यासानुसार, अननसमध्ये आढळणारे "ब्रोमेलेन" नावाचे एन्झाइम प्रभावीपणे डाग काढून टाकण्यास मदत करते.

डेंटिस्टची मदत घ्या

वर सांगितलेल्या उपायांनीही तुम्हाला काही फरक पडत नसेल आणि तुमचे दात अधिकाधिक पिवळे होत असतील तर याबाबतीत डेंटीस्टची मदत घ्या. कधी कधी पिवळा थर इतका मजबूत झालेला असतो की कोणत्याही घरगुती उपायाने तो काढणे कठीण होऊन बसते.

बेकिंग सोडा वापरा

NCBI वर प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, बेकिंग सोडा दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकण्यास मदत करतो तर हायड्रोजन पेरोक्साइड हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जे बॅक्टेरिया नष्ट करण्यात किंवा त्यांना मारून टाकण्यात मदत करते. एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड घ्या. दोन्ही चांगले मिक्स करा. नियमितपणे दात घासण्यासाठी या पेस्टचा वापर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने