आयुर्वेद हा अनादी काळापासून असणारा आजारांवरील उत्तम उपाय आजही वापरण्यात येतो. अधिक काळापासून डोकेदुखी, नैराश्य, डोळ्यांची दृष्टी कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्यांवर आयुर्वेदामध्ये एक सोपा उपाय आहे. भारताशिवाय नेपाळ, श्रीलंकेतही आयुर्वेदाचा अधिक उपयोग करण्यात येतो.
आयुर्वेदातील उपाय करून कोणताही दुष्परिणाम होत नाही असं सांगण्यात येतं. किमान ५००० वर्ष जुनी परंपरा असून संस्कृत शब्द अयुर अर्थात जीवन आणि वेद अर्थात ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. आयुर्वेदिक उपायांचा वेदपुराणांमध्येही उल्लेख आढळतो. यातील अशी एक पद्धत ज्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता, ज्याचे नाव आहे शिरोधारा. शिरोधारा पद्धती आयुर्वेदातील पंचकर्मामध्ये येते. याबाबत अधिक माहिती दिली आहे आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी दिली आहे.
शिरोधारा पद्धती काय आहे?
शिरोधारा म्हणजे कपाळाच्या मध्यभागी येणारी धारा. या पद्धतीमध्ये कपाळाच्या मध्यभागी तेलाची धार सोडण्यात येते आणि मानसिक आजारांपासून अनेक आजार बरे करण्यात येते. अनेक ठिकाणी आजही या पद्धतीचा वापर करण्यात येतो.
शिरोधारा हा प्रकार अनादी काळापासून करण्यात येतो आणि पंचकर्म हा एक आयुर्वेदातील उत्तम प्रकार आहे. यामध्ये रूग्णाच्या गरजेप्रमाणे नारळपाणी, ताक, दुधाचाही वापर करण्यात येतो. या प्रक्रियेमुळे मन शांत होण्यास मदत मिळते.
४० आजारांपासून सुटका
शिरोधारा ही अशी पद्धती आहे ज्यामुळे तुम्हाला ४० प्रकारच्या आजारांपासून दूर राहाता येतो. ज्या व्यक्तींना अधिक काळापासून डोकेदुखी, झोप न येणे, नैराश्य, डोळ्यांची दृष्टी कमी होणे अथवा स्मरणशक्ती कमी होणे यासारखे त्रास जाणवतात त्यांनी शिरोधारा या पद्धतीचा वापर करून घ्यायला हवा. यावर शिरोधारा हा उत्तम उपाय मानला जातो.
७ दिवसात डोकेदुखी गायब
साधारण ७ दिवस शिरोधारा पद्धतीचा अवलंब केल्यानंतर डोकेदुखी गायब होते. यामध्ये विशिष्ट पद्धतीने कपाळावर तेलाची धार सोडण्यात येते आणि व्यवस्थित मसाज करण्यात येतो. त्यानंतर शरीरातील हार्मान्स रिलीज होतात आणि आजार, डोकेदुखी गायब होण्यास मदत मिळते.
केसगळती करते कमी
शिरोधारा थेरपीमुळे केसगळतीची समस्या कमी व्हायला मदत मिळते. जर तुम्ही सतत केसगळतीमुळे त्रस्त असाल अथवा तुमचे केस कोरडे झाले असतील तर शिरोधारा थेरपीची मदत तुम्ही घ्यावी. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
त्वचेसाठीही फायदेशीर
इतकंच नाही तर आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही शिरोधारा पद्धतीचा फायदा होतो. चेहऱ्याची चमक अधिक वाढविण्यासाठी आणि वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या, फाइन लाईन्स कमी करण्यासाठीही शिरोधाराचा उपयोग करून घेता येतो. आयुर्वेदातील अनेक वनस्पतींचा उपयोग करून हे तेल बनविण्यात येते ज्याचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो.
अनिद्रेपासून सुटका
ज्या व्यक्तींना झोप न येण्याचा त्रास आहे त्या व्यक्तींसाठी शिरोधारा थेरपी वरदान ठरते. दिवसभर झोप न आल्याने सतत थकवा आणि आळस येतो. मात्र शिरोधारा थेरपीमध्ये देण्यात येणाऱ्या मसाजमुळे अनिद्रेपासून सुटका मिळते. थकवा दूर होतो आणि व्यवस्थित झोप लागण्यास मदत मिळते.