बापरे, शरीराचा हा अवयव सतत गरम असेल तर समजून जा लिव्हर पडलंय ठप्प, ही 5 लक्षणं इग्नोर करत असाल तर जाऊ शकतो जीव

व्यक्ती आपली त्वचा, केस, डोळे आणि नाक यांची खूप काळजी घेतो, कारण यात काही त्रास झाला तर सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही बिघडते. पण तिचं व्यक्ती यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवाकडे मात्र लक्ष देत नाही कारण त्याच्या मते असे अवयव आणि त्यांचे आरोग्य हे दुय्यम असते. पण हीच गोष्ट खूप चुकीची आहे. तुम्ही ही चूक अजिबात करू नका. उलट तुम्ही अशा अंतर्गत अवयवांकडे लक्ष दिले पाहिजे. लिव्हरमध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा तो लगेच लक्षात येत नाही.

पण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरावर बारीक नजर ठेवता तेव्हा काही लक्षणांमुळे तुम्ही लिव्हरचा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखू शकता. द योगा इंस्टीट्यूट ऑफिशियलच्या मते, यकृतातील कोणतीही समस्या तळव्यांद्वारे ओळखली जाऊ शकते. यातून फॅटी लिव्हर, रक्ताभिसरणमधील बिघाड, रक्त स्वच्छ नसणे या गोष्टी ओळखता येतात. चला आजच्या लेखात यकृताशी निगडीत आजाराच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.




तळवे सुजणे

तळवे सुजणे किंवा चालताना दुखणे ही एक सामान्य समस्या असू शकते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यास फॅटी लिव्हर आजार अधिक धोकादायक ठरू शकतो. द योगा इन्स्टिटय़ूटच्या म्हणण्यानुसार, यकृतामध्ये द्रव साचते किंवा फॅटी लिव्हर आजार होतो तेव्हा तळवे सुजतात.

तळवे गरम राहण्याचे कारण

खूप चालताना तळवे गरम होतात, तर काहींना चपला घातल्यामुळेही हे जाणवू लागते. पण हे यकृत बिघडल्याचे लक्षण देखील असू शकते, याचा अर्थ यकृत योग्य प्रकारे रक्त साफ करत नाही असाही असू शकतो.

तळव्याला खाज येणे

हे लक्षण ओळखण्यास अजिबात उशीर करू नका. कारण हार्ट फेल्युअरमुळे तळव्यांना खाज येते. हार्ट फेल्युअरमुळे, यकृतामध्ये रक्तसंचय होते, ज्यामुळे तळव्याला खाज येऊ लागते.

पायांमध्ये जाड नसा दिसू लागणे

पायात दिसणाऱ्या निळ्या-व्हायलेट नसांना स्पायडर व्हेन्स म्हणतात. हे तळव्यांमध्ये देखील होऊ शकते. जे खूप इस्ट्रोजेन असण्याचे लक्षण आहे. जेव्हा यकृत काम करणे थांबवते तेव्हा शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन्स वाढतात.

तळव्यावर डाग येणे

काही लोकांच्या तळवे आणि पायावर डाग पडतात. याचा अर्थ तुमच्या शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे यकृताचे कार्य बंद होऊन पाय दुखू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने