देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. जागतिक मंदीमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक मंदीच्या भीतीचा परिणाम विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
अलीकडेच अनेक आयटी कंपन्यांनी जगभरातून लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. यातच आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नोकर भरती जाहीर केली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 40,000 नोकर भरती जाहीर केली आहे. TCS कंपनीचे सीईओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की कंपनी चालू आर्थिक वर्षात 40,000 कॅम्पस प्लेसमेंट नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, "आम्ही साधारणपणे 35,000 ते 40,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आहे. इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी अलीकडे सांगितले होते की गेल्या वर्षी 50,000 कर्मचाऱ्यांची भरती केली होती.
एन गणपती सुब्रमण्यम म्हणाले , " गेल्या 12 ते 14 महिन्यांत कंपनीने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. हे किती काळ चालू राहील हे आम्हाला माहित नाही.''
कंपनीने 11 ऑक्टोबर रोजी चालू आर्थिक वर्षाच्या (जुलै-सप्टेंबर 2023) दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की सप्टेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा सुमारे 9% वाढून 11,342 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात ऑर्डर मिळाल्यामुळे त्यांचा नफा वाढण्यास मदत झाली.
कंपनी प्रति शेअर 9 रुपये लाभांश देणार
TCS ने पात्र भागधारकांना प्रति शेअर 9 रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने सांगितले की, 7 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीच्या त्या इक्विटी भागधारकांना दिला जाईल, ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदवली गेली आहेत.