पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे मसूर डाळ, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

भारतीय स्वयंपाकघरात हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे डाळ होय. विविध प्रकारच्या डाळींचा आपल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. या डाळींमध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ इत्यादी डाळींचा समावेश होतो. या डाळींपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. या डाळींमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली मसूर डाळ आपल्यातील अनेक जण चवीने खातात. ही मसूर डाळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कर्बोदके आणि समृद्ध फायबर्समुळे मसूर डाळ वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. मधुमेहीच्या रूग्णांसाठी मसूर डाळ अधिक फायदेशीर आहे. या डाळीचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.
हृदयासाठी फायदेशीर

आजकाल हृदयरोग आणि वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. जर तुम्हाला हृदयरोग किंवा वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या भेडसावत असेल तर तुमच्या आहारात मसूर डाळीचा समावेश करा. यामुळे, शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच, हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका ही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

वजन नियंत्रित राहते

मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे आणि कर्बोदकांचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, जेव्हा आपण या डाळीचे सेवन करतो तेव्हा, आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे, फार भूक लागत नाही. त्यामुळे, आपल्या शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहते.

इतकच नव्हे तर फायबर्सने समृद्ध असलेल्या डाळीच्या सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे, पोटाच्या आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात मसूर डाळीचा जरूर समावेश करा.

मधुमेहींसाठी लाभदायी

मसूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, त्यामुळे या डाळीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. परिणामी, मधुमेहाची समस्या देखील टाळता येते. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात मसूर डाळीचा जरूर समावेश करावा. (Beneficial for diabetics)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मसूर डाळ ही अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. या डाळीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यासोबतच, खोकला, सर्दी, ताप आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करण्याचे काम मसूर डाळ करते. त्यामुळे, मसूर डाळीला आपण इम्युनिटी बूस्टर असे ही म्हणू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने