दिवसातून या वेळेत पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले

सुदृढ आरोग्य हवे असल्यास पाण्याशिवाय पर्याय नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरात तहान लागेल तेव्हा पाणी आवर्जून प्यायलाच हवे. पण पाणी कसे प्यावे आणि किती प्यावे हे समजून घेणे महत्वाचे आहे
योग्यप्रकारे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो. तसेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत मिळते. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट अंशु दुआ हिने दिवसभरातून पाणी कधी कोणत्यावेळी आणि किती प्रमाणात प्यावे हे सांगितलं आहे.




सकाळी यावेळी प्यावे पाणी
सकाळी उठल्यावर तुमच्या शरीराचं खूप तासांच इंटरमिटेंट फास्टिंगमधून उभं राहतं. अशावेळी शरीराला आधार म्हणून सकाळी उठल्यावर पहिलं पाणी प्यावं. जमल्यास कोमट पाणी प्यायल्यास शरीराला फायदा होतो.
​जेवणाअगोदर प्या पाणी
कोणतही मिल घेण्याअगोदर जर पाणी प्यायलात तर पोटाला खूप मोठा आधार मिळतो. महत्वाचं म्हणजे जेवणाअगोदर पाणी प्यायल्यास भूक क्षमते आणि जेवण कमी खाल्लं जातं. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
​घाम येत असेल तर पाणी प्या
खूप घाम येत असेल तर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण खूप घाम येत असेल तर शरीर डिहायड्रेट होतं. अशावेळी शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवण्यास पाणी पिणे गरजेचे आहे.
​मसाज केल्यानंतर पाणी प्या
मसाज केल्यानंतर शरीरातील घाणी बाहेर फेकून देण्यासाठी तुम्हाला पाणी मदत करेल. तसेच मसाजमुळे थकवा आलेला असतो अशावेळी पाण्याने थोडा आराम मिळेल.
​आंघोळ करण्यापूर्वी प्या
आंघोळीला जाण्यापूर्वी एक ग्लासभर पाणी प्या. यामुळे लो ब्लड प्रेशर राहण्यास मदत होते. अनेकदा आंघोळ करताना गरम पाणी आणि दरवाजा बंद असल्यामुळे अनेकांना सफोकेशनचा त्रास होतो. अशावेळी पाणी प्यायल्यास हायड्रेट राहणे गरजेचे आहे.
​झोपण्यापूर्वी पाणी प्या
झोपायला जाण्यापूर्वी एक ग्लासभर तरी पाणी प्या. यामुळे रात्रभर तुमचं शरीर हायड्रेट राहिल. ७ ते ८ तासांच्या झोपेत शरीराला पाणी मिळत नाही. यामुळे अगोदरच पाणी पिणे झोपणे फायद्याचे ठरते.
​व्यायामाच्या अगोदर-नंतर
एक्सरसाइज करताना पाणी प्यायला नाहीत तरी देखील व्यायामाच्या अगोदर आणि नंतर पाणी प्या. व्यायाम करताना घामाद्वारे शरीरातील पाणी निघून जाते. अशावेळी तुम्ही व्यायामाच्या अगोदर आणि नंतर पाणी प्या. पण ते पाणी कायमच बसून प्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने