मुश्रीफांच्या घरावरील ED च्या छाप्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर

 कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या आज (सोमवार) कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांतच सोमय्या कोल्हापुरात आले आहेत.त्यांच्या दौर्‍याला कोणीही विरोध करणार नाही, असं मुश्रीफांनी  स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळं कार्यकर्ते संतप्त आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍याकडं राज्याचं लक्ष लागलंय. ईडीच्या या छापेमारीनंतर सोमय्या आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये  दाखल झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.



विशेष म्हणजे, मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनीच त्यांची ईडीकडं तक्रार केली होती. मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर आणि कागलमध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आज सोमय्या हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.ते आज सकाळी अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर आज पहिल्यांदाच सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांचं कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आलं. आज अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने