डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरते कच्ची लसूण, अशी करा डाएटमध्ये समाविष्ट

प्रत्येक भारतीय किचनमध्ये लसूणचा वापर केला जातो. जेवणाचा स्वाद आणि सुगंध अधिक चांगला करण्यासाठी लसूण आपण वापरतो. पण याशिवाय लसणीचा अनेक गंभीर आजारांसाठीही उपयोग करून घेता येतो. लसणीमध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट्स गुण आढळतात.

याशिवाय लसणीमध्ये मँगनीज, कॅल्शियम, कॉपर अशी अनेक पोषक तत्व आहेत. लसूण खाण्याचे अनेक लाभ आहेत. पण कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसच्या रूग्णांसाठी हे अधिक फायदेशीर मानले जाते. यामध्ये असणारे गुण हे आजार नियंत्रणात राखण्यास मदत करते. मात्र हे नियंत्रणात राखण्यासाठी लसूण कशा पद्धतीने खावी जाणून घ्या.उपाशीपोटी खावी कच्ची लसूण

ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांच्यासाठी कच्ची लसूण रामबाण उपाय ठरते. हेल्थ एक्स्पर्टनुसार, कच्ची लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात आणता येतो. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये आढळणारे यौगिक एलिसिन बॅड कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात आणण्यास मदत करते. तुम्ही जर कोलेस्ट्रॉलच्या समस्येने हैराण असाल तर रोज सकाळी १ ग्लास पाण्यासह कच्च्या लसणीच्या काही पाकळ्या तुम्ही खाव्या.

भाजलेली लसूण

लसूण भाजूनही तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. ऑलिव्ह ऑईलमध्ये लसणीच्या पाकळ्या भाजून घ्या आणि जेव्हा त्या थंड होतील तेव्हा खा. भाजलेली लसूण चविष्टही लागते आणि याचा वापर तुम्ही भाजी वा आमटीमध्येही करू शकता. शुगर नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने लसूण खाऊ शकता.

लसूण चहा

शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी लसणीचा चहा हा एक हेल्दी पर्याय आहे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याचा समावेश करून घ्या आणि आरोग्यासंंबंधित अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते.

लसूण चहा बनविण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी उकळून घ्या आणि त्यात २-३ पाकळ्या लसूण मिक्स करून उकळा. त्यानंतर त्यात १-२ चमचा दालचिनी पावडर मिक्स करा. काही वेळानंतर गॅस बंद करा आणि गाळून लसणीचा चहा प्या.

लसूण तेल

लसूण तेल आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांसाठी उपयुक्त ठरते. तुम्ही जेवण बनविण्यासाठी लसूण तेलाचा वापर करू शकता. सलाडमध्येही या तेलाचा वापर तुम्हाला करता येईल. कोलेस्ट्रॉलची समस्या कमी करून साखर नियंत्रणात आणण्यासाठी याचा फायदा होतो.

लसूण तेल बनविण्यासाठी लसणीची सालं काढा आणि पेस्ट बनवा. त्यानंतर एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल घ्या, त्यात लसूण पेस्ट भाजा. गॅस बंद केल्यावर तेल गाळून घ्या आणि एका कोरड्या डब्यात ठेवा आणि जेवणात याचा उपयोग करा.

लसूण आणि मध

लसूण आणि मध एकत्र खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्ही लसणीच्या पाकळ्यांचे तुकडे करा आणि यामध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण चावून खा. याचा स्वाद तिखट लागला तर त्यावर तुम्ही गरम पाणीही पिऊ शकता. काही जण लसणीच्या पाकळ्या मधात भिजवून ठेऊ शकता आणि नियमित खाऊ शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने