हिवाळ्यात व्यायाम करायचा असं ठरवता पण जमत नाही? तर या टिप्सने स्वतःला करा प्रेरित

निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. मात्र, थंडीच्या मोसमात प्रत्येकाला सकाळी लवकर अंथरुणातून उठून व्यायाम करण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत, असे बरेच लोक आहेत जे व्यायाम करण्यास टाळतात.

याच कारणामुळे आपण हिवाळ्यात लेथार्जिक होतो. वजनही वाढते. जर तुम्हालाही हिवाळ्यात व्यायाम करता येत नसेल तर या टिप्सच्या मदतीने तुम्ही व्यायामासाठी स्वतःला मोटिव्हेट करू शकता.
हिवाळ्यात व्यायाम करण्यासाठी स्वतःला असे प्रवृत्त करा

हिवाळ्याच्या मोसमात घर सोडून जिममध्ये जाणे अवघड वाटत असेल तर तुम्ही घरीच व्यायाम करू शकता. तुमच्या आवडत्या म्युझिक बीटवर काही वेळ डान्स करून तुम्ही घरी वर्कआउट देखील करू शकता.

तुम्ही थंडीच्या काळात ऑनलाइन फिटनेस क्लासेसमध्ये सहभागी होऊ शकता. व्यायाम करण्याचा हा एक अतिशय उत्तम आणि आरामदायी मार्ग आहे.

जर तुम्ही थंड वातावरणात स्वतःला व्यायाम करण्यास प्रवृत्त करू शकत नसाल, तर ज्याच्या सहवासात तुम्हाला आनंद मिळतो अशा पार्टनरचा शोध घ्या. तुमचा भाऊ, बहीण, शेजारी किंवा मित्रासोबत व्यायाम करा, यामुळे कसरत आणि गप्पाटप्पा दोन्ही होतील.

ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी तुमच्या व्यायाम भागीदाराला आव्हान द्या. जेव्हा तुम्ही हे आव्हान लक्षात ठेवता, तेव्हा तुम्ही स्पर्धेच्या भावनेने व्यायाम करण्यास तयार व्हाल.

तुम्ही फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी सायकलिंग करू शकता. जिममध्ये जाऊन जर तुम्हाला व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर सायकलिंग हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. काही सामान घेण्यासाठी सकाळी घराबाहेर पडलात तर सायकलचा वापर करावा.

आपल्या शरीरात सायकलिंगच्या मदतीने ऊर्जा तर येतेच पण तंदुरुस्त राहण्यासही खूप मदत होते. दिवसातून दोनदा जर तुम्ही सायकलिंग करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घरच्या घरी तुम्ही स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने